Pimpri Corona Update: शहरातील 322 युवकांना कोरोनाचा संसर्ग; पाहा कोणत्या वयोगटातील किती जणांना लागण?

Pimpri Corona Update: 322 youths in the city infected with corona; See how many people are infected at what age पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाने सर्वाधिक विळखा युवकांना घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 322 युवकांना आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. युवकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत असून युवक पुढे येत असल्याने त्यांच्यावर उपचार करता येत आहेत. अन्यथा युवक कोरोना ‘कॅरियर’ (वाहक) होवू शकतात. दरम्यान, आजपर्यंत शहरातील तब्बल 788 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आता शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

दिवसाला 40 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. 10 मार्चपासून शहरातील तब्बल 788 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 458 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 316 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यापैकी 169 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण त्यांना काहीच लक्षणे नाहीत. तर, 114 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. 21 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. शहरातील 14 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण 22 ते 39 वयोगटातील युवकांमध्ये आहे. आजपर्यंत शहरातील तब्बल 322 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने सर्वाधिक युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील तब्बल 322 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांमध्ये आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वय वर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 183 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 97 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 92 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 93 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.