Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 4 हजार 875 रुग्णांची नोंद; 2 हजार 527 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 4 हजार 875 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. कोरोना विषाणू सुरु झाल्यापासून सर्वांधिक रुग्णसंख्येची आज नोंद झाली आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील तीन रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 538 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 23 हजार 174 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 25 हजार 837 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 25 हजार 253 रुग्ण गृहविलगीकरणात असून 584 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 118 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 666 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 679 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 17 हजार 254 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.