Pimpri Corona Update : शहरात आज 50 नवीन रुग्णांची नोंद; 111 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Corona Update) विविध भागातील 50 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 111 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

Pimpri Ganeshotsav : गणेशोत्सवात 152 टन निर्माल्य संकलित

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 70 हजार 599 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 374 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 368 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, केवळ 6 रुग्ण महापालिका (Pimpri Corona Update) रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 1 हजार 924 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 63 हजार 295  जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.