Pimpri Ganeshotsav : गणेशोत्सवात 152 टन निर्माल्य संकलित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Ganeshotsav) वतीने गणेशोत्सवात 31 ऑगस्ट 2022 ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत 152 टन निर्माल्य संकलित झाले.

अ प्रभागातून 7 खेपामधून 26 हजार 935 किलो, ब प्रभागातून 4 खेपामधून 18 हजार 585 किलो, क प्रभाग 7 खेपामधून 13 हजार 475 किलो, ड प्रभाग 7 खेपामधून 19 हजार 885 किलो, ई प्रभाग 3 खेपामधून 14 हजार 730 किलो, फ प्रभाग 3 खेपामधून 19 हजार 390 किलो, ग प्रभाग 4 खेपामधून 15 हजार 665 किलो आणि ह प्रभाग 3 खेपामधून 12 हजार 305 किलो असे एकूण 8 प्रभागाच्या 38 खेपामधून 1 लाख 40 हजार 970 किलो निर्माल्य जमा झाले. त्यापासून खत निर्मीती केली जाणार आहे.

Pradhanmantri Matruvandana : …’असा’ मिळवा मातृवंदना योजनेचा लाभ!

या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 16 मधील मेट्रो गार्डन रावेत आणि प्रभाग क्रमांक 18 ऑक्सिजन पार्क चिंचवड येथे व प्रभाग क्रमांक 22 जोतिबा गार्डन काळेवाडी या उद्यानात कंपोष्ट पीटमध्ये 12 टन निर्माल्य पाठविण्यात आले आहे, असे एकूण 1 लाख 52 हजार 970 (152 टन) निर्माल्य (Pimpri Ganeshotsav) संकलीत केले असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.