Pune Ganpati Visarjan 2022 : अखेर 29 तासांनी संपली विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज : दोन वर्षानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर (Pune Ganpati Visarjan 2022) सज्ज झाले होते. अखेर 29 तासानंतर अनंत चतुर्दशीला सुरु झालेली विसर्जन मिरवणूकीने पूर्णविराम घेतला. यंदा पुण्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे निर्बंधमुक्त मिरवणूक असल्याने ढोल ताशापासून ते डॉल्बीपर्यंत पुणेकरांनी मनमुराद नाचून आनंद घेतला.

काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली होती ती तब्बल २९ तास चालली. संध्याकाळी 5.30 वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि पुणे शांत झाले. लहान मंडळापासून ते मोठ्या मानाच्या गणपतींपर्यंत सर्वत्र ढोल-ताशा, डॉल्बी, वेगवेगळे देखावे आणि त्यामुळे झालेली ट्राफिक पाहायला मिळाली. कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील होताच. शेवटी थकलेल्या पोलिसांनीही डॉल्बीवर ठेका धरला. अशा प्रकारे उत्साहात यंदाची मिरवणूक आणि विसर्जन सोहळा (Pune Ganpati Visarjan 2022) पार पडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.