Pimpri Corona Update: शहरात आज 629 नवीन रुग्णांची नोंद, 219 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona Update: 629 new patients registered in the city today, 219 discharged, 17 dead शहरातील रुग्णसंख्या 11038 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 592 आणि शहराबाहेरील 37 अशा 629 जणांना आज (रविवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 219 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 11038 वर पोहोचली आहे.

आज 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दिघीतील 62 वर्षीय पुरुष, चिखलीतील 63,64 वर्षीय दोन पुरुष, निगडीतील 21 वर्षांचा तरुण मुलगा, 45 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 54, 55 वर्षीय असे दोन पुरुष, चिंचवडमधील 59 वर्षीय महिला, भोसरीतील 54 वर्षीय महिला, पिंपरीतील 63 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 57 वर्षीय पुरुष.

रुपीनगर मधील 52 वर्षीय पुरुष आणि चाकण येथील 60 वर्षीय महिला, दौंडमधील 43 वर्षीय पुरुष, तळेगांव दाभाडेतील 52 वर्षीय पुरुष, खडकीतील 52 वर्षीय पुरुष, शिरपूरमधील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, पालिकेच्या कोविड डॅशबोर्डवरील आणि प्रसिद्धापत्रातील मृत्यू बाबतच्या संख्येच्या माहितीत मोठा फरक दिसून येत आहे.

शहरात आजपर्यंत 11038 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 6699 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 197 जणांचा तर शहराबाहेरील परंतु, महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 57 अशा 254 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3165 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल
# दाखल झालेले संशयित रुग्ण – 2960
# पॉझिटिव्ह रुग्ण – 629
# निगेटिव्ह रुग्ण – 872
# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 872
# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3165
# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 2627
# आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह संख्या – 11038
# सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – 3165
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 254
# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 6699
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 22911
# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 75181

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.