मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pimpri Corona Update : शहरात आज केवळ 9 नवीन रुग्णांची नोंद; 16 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. रुग्णसंख्या 10 च्या आत आली असून शहराच्या विविध भागातील केवळ 9 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 69 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 406 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 396 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Symbiosis Skills Day : अन मेट्रो स्टेशनवरच भरले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन

तर, 10 रुग्ण महापालिका (Pimpri Corona Update) रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 278 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 71 हजार 380  जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Latest news
Related news