Pimpri Corona Update: रुग्णसंख्येतील वाढ कायम, शहरात आज नवीन 1 हजार 706 रुग्णांची नोंद, 387 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 706 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 387 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 527 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 87 हजार 919 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 8 हजार 13 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 7 हजार 610 रुग्ण गृहविलगीकरणात असून 403 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 66 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 399 आहेत. आज दिवसभरात 17 हजार 536 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 12 हजार 796 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.