corona Update Pimpri Chinchwad : आज 98 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या पोहोचली 1110 वर

Coronavirus infection in 98 people today; The patient population reached 1110

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्ण वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 93 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय शहराबाहेरील पाच जणांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी सात पर्यंतची ही आकडेवारी आहे. आजपर्यंत शहरातील 1110 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील जुनी सांगवी, अजंठानगर, संत तुकारामनगर -भोसरी, श्रीदत्त कॉलनी, बेलठीकानगर -थेरगाव, गुलाबनगर, पवार वस्ती, जयभीमनगर, सिद्धार्थ नगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, नाणेकर चाळ पिंपरी, काळेवाडी, संजय गांधी नगर पिंपरी, भीमनगर, नेहरुनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, दत्तनगर दिघी, आनंदनगर, वैष्णवदेवी मंदिर पिंपरी, जाधववाडी, चिखली, रमाबाई नगर, बौद्धनगर, मिलिंदनगर पिंपरी, अंकुश चौक निगडी, शिवतीर्थनगर रहाटनी, पोलीस कॉलनी वाकड, जयमालानगर सांगवी, सुदर्शनगर पिंपळेगुरव परिसरातील 93 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 53 पुरुष आणि 40 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय शहराबाहेरील आंबेडकर वसाहत औंध, जुन्नर येथील तीन पुरुष आणि दोन महिला अशा पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

दिवसभरात एकूण 98 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, आनंदनगर,नेहरुनगर, साईनाथनगर निगडी, महात्मा फुलेनगर, नानेकर चाळ पिंपरी, मोरवाडी, पिंपळेगुरव, दत्तनगर, सद््गुरु कॉलनी वाकड, रूपीनगर, पवार वस्ती दापोडी, रमाबाईनगर पिंपरी, थरमॅक्स चौक येथील उपचाराला दहा दिवस पुर्ण झालेल्या व कोणतीही लक्षणे नसलेल्या 28 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज शुक्रवारपर्यंत 1110 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 544 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 18 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 37 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 526 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 191

# पॉझिटीव्ह रुग्ण – 98

#निगेटीव्ह रुग्ण – 291

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 181

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 744

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 208

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1110

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 526

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 37

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 544

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 22065

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 67240

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.