Pimpri : भरदिवसा घरफोडी करून 52 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 52 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना पंचशील हॉटेलच्या मागे इंदिरानगर चिंचवड येथे शनिवारी (दि. 19) सकाळी दहा ते बारा या कालावधीत घडली.

बबिता आनंदा मोरे (वय 55, रा. पंचशील हॉटेलच्या मागे, इंदिरानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबिता यांचे घर शनिवारी सकाळी दहा ते बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून 52 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. दुपारी बबिता घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून त्यांनी गुरुवारी (दि. 24) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सिरसाठ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.