Pimpri : पाण्याच्या टाकीचा कॉक तोडताना अडवले म्हणून तरूणीला शिवीगाळ

एमपीसी न्यूज : सोसायटीच्या (Pimpri) पाण्याच्या टाकीचा कॉक तोडत असताना तरुणीने पती-पत्नीला अडवले. यावेळी त्या दाम्पत्याने तरुणीला शिवीगाळ केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.22) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

संजय कांबळे (वय 45 रा. पिंपरी) व त्याच्या पत्नीवर तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोसायटीच्या पाण्याच्या टोकीतून पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी ते जाणून-बुजून पाण्याच्या टाकीचे कॉक तोडत होते. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना अडवले. यावरून आरोपींनी खोट्या आरोपात अडकवतो तुला म्हणत शिवीगाळ करत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.