Pimpri News: माजी महापौर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रंगनाथ फुगे यांचे कोरोनामुळे निधन

Pimpri news: Former mayor, senior NCP leader Ranganath phuge dies due to corona तीनवेळा त्यांनी फुगेवाडीचे प्रतिनिधित्व केले. 1996 ते 1997 दरम्यान त्यांनी शहराचे महापौरपद देखील भूषविले होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगनाथ फुगे यांचे आज (दि.18) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांचे वय 80 होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फुगेवाडी प्रभागातून रंगनाथ फुगे काँग्रेसच्या चिन्हावर पिंपरी-चिंचवड पालिकेत निवडून आले होते. तीनवेळा त्यांनी फुगेवाडीचे प्रतिनिधित्व केले. 1996 ते 1997 दरम्यान त्यांनी शहराचे महापौरपद देखील भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शेवटपर्यंत ते सक्रिय होते.

फुगे यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.