Pune News: सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन

Senior leader Former MLA Sudhakar Paricharak passed away सुमारे 9 वर्षे त्यांनी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

एमपीसी न्यूज- सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकरपंत परिचारक (वय 84) यांचे कोरोनामुळे निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मधुमेह आणि उच रक्‍तदाबाचा त्रास वाढल्याने सोमवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. पंढरपूरच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते.

सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे 5 वेळा नेतृत्व केले होते. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती.

सुमारे 9 वर्षे त्यांनी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. बंद पडलेल्या भीमा, पांडुरंग सहकारी कारखान्यांना उर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघ, पंढरपूर अर्बन बँक, नगर परिषद, बाजार समिती आदी संस्था भरभराटीला आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.