Pimpri Ganesh Festival News : गणेशोत्सवाची लगबग ! पर्यावरणपूरक गणेशमूर्तीना पंसती, बाजारपेठ सजली

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी देखील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.10) घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध शोभेच्या वस्तूंनी गजबजली आहे. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सावाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे नागरीक पर्यावरणूरक गणेशमूर्तीना पंसती देत आहेत.

सलग दुस-या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली देखील जाहीर केली आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येत आहे. रंगबिरंगी फुले, फुलांच्या माळा, लाईटच्या वेगवेगळ्या माळा, मुकूट, मंगळागौर सजावटीच्या विविध वस्तू यांनी बाजारपेठ सजली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत अनेक माध्यामातून जनजागृती केली जात असून याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अनेक भाविक पर्यावरणूरक गणेशमूर्तीना पंसती देत आहेत. शहरात अनेक ठिकाणी असे पर्यावरणूरक गणेशमूर्तींचे स्टॉल लागले आहेत. प्रतिकात्मक आणि विविध आकार, रंगांच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.