MPC Online Ganeshotsav News : सहभागी व्हा ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाइन गणेशोत्सवात

एमपीसी न्यूज – सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वांची लगबग सुरु आहे. आकर्षक सजावट करण्याकरिता खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत पहिले एमपीसी न्यूजपोर्टल यंदा ऑनलाइन गणेशोत्सवही संकल्पना राबवत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती एमपीसी न्यूजच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नांना एमपीसी न्यूजबळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा एमपीसी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या प्रसिद्ध मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. बाप्पाचे फोटो [email protected][email protected] या मेलवर पाठवावेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.