Pimpri News: आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच कार्यकर्त्यांना भेटतील – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. लक्ष्मणभाऊ बाणेर येथील रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाऊ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी माहिती दिली.

व्हिडिओत आमदार महेश लांडगे म्हणाले, “लाडके लोकनेते, आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती सुधारत आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. दोन ते तीन दिवसात एकदम व्यवस्थित होऊन ते डिस्चार्ज घेऊन घरी येतील. डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच बरे होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी घरीच थांबावे. आपले काम करावे. ज्यावेळी भाऊ व्यवस्थित होतील. त्यावेळी सगळ्यांना भेटतील ही माझी नम्र विनंती”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.