Pimpri News : पिंपरीत ट्रॅफिक जॅम ; मुख्य बजार, रिव्हर रोड, भाट नगर रस्त्यावरील वाहतूक खोळंबली (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातील रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झालं आहे. पिंपरी मुख्य बाजार, रिव्हर रोड, भाट नगर या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. इंदिरा पुलावरुन शगुन चौकाकडे जाणारा मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी बंद केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

इंदिरा पुलावरुन शगुन चौकाकडे जाणा-या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी आज दुपारी पुलावरुन शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच भाटनगर कडे जाणारा मार्गाची वाहतूक दुतर्फा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक वेग मंदावला असून, वाहनं पुढे सरकण्यासाठी वेळ लागत आहे.

 

 

पिंपरी मुख्य बाजार आणि रिव्हर रोड या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. रविवार सुट्टीचा वार असल्याने खरेदीसाठी येणा-या नागरिकांमुळे बाजारपेठ गजबजलेली असते पण, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.