Pimpri : महापालिका कर्मचा-यांना मतदानासाठी सुट्टी

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना निवडणुकीत मतदान करता यावे, याकरिता 29 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचा-यांना देखील मतदान करता यावे, यासाठी नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

येत्या 29 एप्रिलला मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता निवडणूक विभागाने जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय कंपन्यांमधील कामगारांना देखील मतदान करता यावे, याकरिता सुट्टी जाहीर करण्याचा आदेश दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर मावळ अथवा शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्य असलेल्या महापालिका सेवेतील कर्मचा-यांनादेखील मतदान करता यावे, याकरिता सार्वजनिक सुट्टी देण्याचे परिपत्रक महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.