Pimpri Police : अपहरण झालेल्या दीड वर्षाच्या मुलाचा अवघ्या 3 तासात शोध घेण्यास पिंपरी पोलिसांना यश

एमपीसी न्यूज : अपहरण झालेल्या अवघ्या (Pimpri Police) दिड वर्षाच्या बाळाचा केवळ 23 तासांत शोध घेण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. रोहित असे या बाळाचे नाव असून आंबेडकर चौकातून त्याचे अपहरण करण्यात आले होते. 

सविस्तर माहिती अशी, की सुनील पवार आणि राधा पवार हे दाम्पत्य मूळचे बार्शी सोलापूरचे. ते दोघेही आपल्या तीन मुलांसह उदरनिर्वाहासाठी पुण्यातील शिवाजीनगर येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मुलांसह ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पेन, टिशू पेपर अशी वस्तू विकतात. 27 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलांना घेऊन ते आपले काम करत होते. दुपारी रवी पवार हे आंबेडकर चौकातील झाडांच्या कुंड्यालगत मुलांना बसवून वडापाव आणण्यासाठी बाजूच्या टपरीवर गेले होते. त्यांच्या पत्नी राधा ही सिग्नलवर वस्तू विकण्यामध्ये व्यग्र होती.  अशावेळी त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आयले.

रवी दहा मिनिटांमध्ये परत आले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले, की त्यांचा दीड वर्षाचा मुलगा रोहित तेथे नव्हता. त्यांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिलाही काही माहीत नव्हते. दोघांनी मिळून आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो मिळाला नाही. आपल्या पोटचा गोळा कोणीतरी हिरावून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत भादवि कलम 363 अन्वये गुन्हा नोंदविला. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाणे, तपास पथक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा युनिट दोन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके बनवून घटनास्थळ परिसरात रवाना केली.

PCMC: गृहनिर्माण सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी पुण्यात बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

परिसरातील प्राथमिक तपसामध्ये (Pimpri Police) पोलिसांना आढळले, की तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेऊन गेली आहे. या आरोपी महिलेचा माग काढण्यासाठी पिंपरी रेल्वे स्थानक, पिंपरी गाव, चिंचवड रेल्वे स्थानक, तळेगाव, देहूरोड, कामशेत लोणावळा, कल्याण इत्यादी ठिकाणच्या सुमारे 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांची फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच, घटनास्थळावरील प्राप्त आरोपीचे फोटो व अपहरण बालकाचे फोटो लोकांना दाखवून चौकशी करण्यात आली.

तपासादरम्यान 28 डिसेंबररोजी रात्री आरोपी महिला मुलासह शिरगाव परिसरात गेल्याचे आढळले. दरम्यान, प्रति शिर्डी साईबाबा मंदिर प्रतिष्ठान शिरगाव येथे एक मुलगा बेवारस असल्याची माहिती मिळाल्याने पिंपरी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सावर्डे, सूर्यवंशी यांनी जाऊन तेथे शहानिशा केली. त्यामध्ये नमूद गुन्ह्यातील महिला आरोपी अपहरत मुलाला सोडून निघून गेल्याचे दिसून आले.

त्या मुलाला तिथून ताब्यात घेऊन फिर्यादीकडून ओळख पटवून रोहितला सुखरूप आई-वडिलांकडे देण्यात आले. अशा प्रकारे 23 तासात अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यात पिंपरी पोलिसांना यश आले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक विवेक पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गुन्हे शाखा युनिट 2 तसेच शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी व मतदार यांनी केले आहे.

आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच कोणी बेवारस बालक आपल्या निदर्शनास आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.