Pimpri: ‘शिवसेना-भाजप’च्या बंडखोरांवर लवकरच कारवाई -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजपची महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार आहेत. बंडखोरांना कोणताही पाठिंबा नाही. शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांवर दोन्ही पक्षाचे नेते लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

अतिउत्साही लोकांनी अर्ज भरला आहे. परंतु, त्यांना जनता धारा देणार नाही असे सांगत बारणे म्हणाले, शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अर्ज भरला असला तरी त्यांना कोणताही पाठिंबा नाही. त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई होईल. शिवसैनिक महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे कोणीही अफवेला बळी पडू नये. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित आहे. केवळ मताधिक्य किती असणार? याची उत्सुक्ता आहे. दीड लाखापेक्षाही जास्त मताधिक्य असेल, असा माझा अंदाज आहे.

चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देखील देऊ शकले नाही. राष्ट्रवादीची राज्यात जशी अवस्था झाली आहे. तशीच वाईट अवस्था शहरात होईल, असेही बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like