Pimpri : पार्क केलेल्या टेम्पोतून सहा लाखांचे स्टील चोरीला

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टेम्पोमधून रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी सहा लाख 20 हजारांचे स्टेनलेस बार (Pimpri) चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री साडेअकरा ते शुक्रवारी (दि.19) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

kamshet : अवैध दारुधंद्यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यावर बेधडक मोर्चा

मुकुंद मानसिंग पवार (वय 54, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या टेम्पोमध्ये स्टेनलेसचे एस एस बार भरले होते. माल भरलेला टेम्पो त्यांनी गुरुवारी रात्री संत तुकाराम नगर मधील रस्त्याच्या बाजूला पार्क केला. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी सहा लाख 20 हजारांचे (Pimpri) स्टेनलेसचे बार चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.