Pimpri : फसवणुकीच्या गुन्ह्यात महिलेला अटक

एमपीसी न्यूज – फसवणुकीच्या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या एका (Pimpri)महिलेला पिंपरी पोलिसांनी अटक केली. जमिनीच्या व्यवहारातून ही फसवणूक करण्यात आली होती.

माधुरी माणिक राऊत (रा. मोहम्मदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी दिलेल्या(Pimpri) माहितीनुसार, आठ जुलै 2023 रोजी जयवीर अमरबहादुर यादव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Maratha Reservation : धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनेमुळे प्रशासनाचा निर्णय

त्यातील आरोपींनी फिर्यादी यांना खेड तालुक्यातील भांबोली येथील जमीन कविता नवनाथ गाडे, नवनाथ पोपट गाडे यांच्याकडून खरेदी करून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्या व्यवहारापोटी शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन खोटे दस्तऐवज तयार केले. फिर्यादी यांनी या व्यवहारासाठी दिलेल्या एक कोटी 36 लाख 98 हजार रुपयांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांनी दिलेल्या रकमेपैकी 37 लाख रुपये 29 मार्च रोजी आणि आठ लाख 51 हजार 190 रुपये हे 3 एप्रिल रोजी माधुरी माणिक राऊत यांच्या बँक खात्यावर वळविण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे आढळल्याने पोलिसांनी माधुरी राऊत या महिलेस 28 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.