PMC ELECTION : ओबीसींना आरक्षण, खुल्या गटातील उमेदवारांची धाकधूक वाढली

एमपीसी न्यूज: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ओबीसी प्रवर्गात आनंदाचे वातावरण आहे. (PMC Election) राजकीय क्षेत्रातूनही याचे स्वागत होत आहे. मात्र ओबीसींच्या आरक्षणाच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गात मात्र धाकधूक वाढली आहे. खुल्या प्रवर्गातील तब्बल 47 जागा कमी झाल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी आता सर्वाधिक स्पर्धा असेल. 

 

 

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसींना आरक्षण द्यावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होते. (PMC Election) अखेर न्यायालयाने यावर तोडगा काढला असून ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील असे जाहीर केले. यापूर्वी न्यायालयाच्याच आदेशानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करून त्यावर अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण ही निश्चित करण्यात आले होते.

 

 

 

पुणे महानगरपालिकेतील 173 पैकी 23 जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या होत्या. उर्वरित 148 जागा या खुल्या प्रवर्गासाठी होत्या. मात्र आता ओबीसी आरक्षण कायम राहिल्याने खुल्या गटातील थेट 47 जागा कमी झाले आहेत. खुल्या गटातील उमेदवाराचे लक्ष पुन्हा आरक्षण सोडतीमध्ये काय होणार याकडे लागला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.