PMPML : बसमध्ये घुसुन प्रवासी आणि ड्रॉयव्हरला मारहाण करून पैसे चोरणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएल (PMPML) बसमध्ये घुसुन प्रवासी व ड्रायव्हरला मारहाण करून पैसे चोरणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत हेमंत पेठे (वय 38 वर्ष, रा माळवाडी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी तीन अनोळखी इसमांच्या विरोधात भा.द.वि कलम 392, 504, 506 व 34 अन्वये भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींची नावे निष्पन्न होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. ओंकार चव्हाण (वय 20 वर्षे, रा. फुगेवाडी) व कुणाल कालेकर (वय 26 वर्षे, रा. फुगेवाडी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

MLA Shirole : औंध रोड-खडकी स्टेशन वाहतूक कोंडीबाबत उच्चस्तरीय बैठक; आमदार शिरोळे यांचा पुढाकार

फिर्यादी यांची पीएमपीएमएलची बस 22 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ॲटलास कॉपको बस स्टॉप कासरवाडी येथे प्रवाशांना उतरविण्याकरिता (PMPML) थांबली होती. अनोखी तीन इसमांनी बसमध्ये चढून फिर्यादीला व बस ड्रायव्हर गौतम भालेराव यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण करून 3,355 रुपये रोख रक्कम जबरदस्ती घेऊन पळून गेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.