Pune : पुणे मनपा भवन व निगडी येथून देहूगांव साठी सुटणार पीएमपीएमएलच्या बसेस

एमपीसी न्यूज – देहुगाव साठी आता पुणे (Pune) मनपा भवन व निगडी येथून पीएमपीएमएल नवीन मार्ग सुरु करत आहेत. देहूगांव परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार या मार्गांचा विस्तार पीएमपीएमएलने केला आहे.

Dehugaon : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

या बसेस 15 ऑगस्ट पासून सुरु कऱण्यात आल्या आहेत. यामध्ये हस क्रमांक 262मनपा भवन ते देहूगांव – हि बस अभंगनगरी, भैरवनाथ चौक, संत तुकाराम क्रिडा संकुल, वडाचा माळ, देहूगांव अशी जाईल. हि बस दर 2 तास 15 मिनीटांनी सुटणार आहे. दुसरा मार्ग 329  निगडी ते देहुगाव बस मार्ग – अभंगनगरी, भैरवनाथ चौक, संत तुकाराम क्रिडा संकुल, वडाचा माळ, देहूगांव असा मार्ग असून. दर 45 मिनिटांनी हि बस सुटणार आहे.

या नवीन मार्गांमुळे  देहुगावातून कामानिमीत्त येणारे नागरिक, विद्यार्थी तसेच तुकोबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही बस उपयुक्त ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.