PMPML : पीएमपीएमएलच्या बेशिस्त वाहक व चालकांची तक्रार करा व बक्षिस मिळवा

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या बेशिस्त वाहक (PMPML) व चालकांची पुराव्यानिशी तक्रार करा व बक्षिस मिळवा अशी ऑफर खुद्द पीएमपीएमएल प्रशासनाने जाहीर केली आहे. या बरोबरच संबंधीत वाहक व चालकावर दंडात्मक कारवाई देखील कऱणाऱ असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने जाहीर केले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळास ड्रायव्हर/कंडक्टरच्या बेशिस्त वर्तनाबाबत नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार तक्रारी व सूचना येत आहेत. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईलवर बोलणे, बसेसना रूट बोर्ड नसणे किंवा चुकीचे बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे अशा तक्रारींचा समावेश आहे.

याचाच विचार करत प्रशासनाने एक परिपत्रकच जाहीर केले असून यामध्ये म्हटले आहे की, ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईलचा वापर करणे, मोबाईल कानाला लावून अगर हेडफोन द्वारे बोलणे सुरक्षिततेच्या दृष्टिने हिताचे नाही.

तसेच बसला रूट बोर्ड नसणे/चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे असे काही अढळल्यास वरील प्रकारच्या तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झाल्यानंतर सदर तक्रारींची शहानिशा करून नागरिकांना 100 रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला संबंधित ड्रायव्हर/कंडक्टर सेवकास एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड त्यांच्या वेतनातून कपात करण्यात येणार आहे.

Pune : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रांट यांची निवड

तरी प्रवाशी/नागरिकांनी अशा ड्रायव्हर/कंडक्टर सेवकांच्या तक्रारी बाबतचे फोटो/व्हिडीओ तसेच बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण,दिनांक व वेळ महामंडळाच्या [email protected] या मेलवरती व 9881495589 या व्हॉटसअॅप क्रमांकावरती किंवा थेट महामंडळाच्या नजीकच्या डेपोमध्ये पुराव्यासह (PMPML) तक्रारी सादर करत येणार आहेत. मात्र, केवळ 100 रुपयांच्या बक्षिसासाठी नागरिक किती प्रतिसाद देतील अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.