Goki Fitness Challenge : ‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा पोलीस आयुक्त शिंदे यांच्या हस्ते बक्षिस वितरण

एमपीसी न्यूज – ‘गोकी फिटनेस चॅलेंज’ (Goki Fitness Challenge) स्पर्धेतील विजेत्यांचा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. हा गौरव सोहळा शुक्रवारी (दि.24) निगडी पोलीस मुख्यालयात पार पडला.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त (पिंपरी विभाग) सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी रावसाहेब जाधव, तसेच गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धेचे एकूण 94 विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. विजेत्यांना स्मार्ट गिअर सायकल बक्षिस म्हणून देण्यात आली.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धा ही दिनांक 26 फेब्रुवारी ते 27 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये 1 हजार किमी सायकल चालविणे आणि 300 किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप ठरविण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत एकूण 2 हजार 194 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांपैकी एकूण 94 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरची स्पर्धा ही यशस्वी रित्या पूर्ण केलेली असून यामध्ये 44 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1 हजार किमी सायकल चालवून स्पर्धा पुर्ण केली. तर, 50 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 300 किमी धावून स्पर्धा पूर्ण केली.

Lumpy Disease : शहरातील 8 जनावरांना लम्पीची बाधा, 700 जनावरांचे लसीकरण

यावेळी पोलीस आयुक्त शिंदे म्हणाले की, माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून गोकी स्मार्ट बॅन्ड या कंपनीने स्पर्धा आयोजित केल्याने त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले. तसेच, पोलीस अधिकारी व अमलदार है फ्रंट वॉरिअरच्या भूमिकेत असून अहोरात्र समाजाच्या सुरक्षितता व लोकांच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्याकरिता आपले स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देऊन आपले कर्तव्य बजावावे. शारीरिक (Goki Fitness Challenge) व मानसिक निरोगी राहायचे असेल तर शरीराला व्यायाम गरजेचा आहे.

या स्पर्धेतील विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग सागर कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखेडे, महिला पोलीस हवालदार सुरेखा देशमुख व पोलीस अंमलदार विनायक विधाते यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस आयुक्तालयाचे आभार मानत स्पर्धेतील आपला अनुभव व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.