Prasad Prakashan : यंदाचा कै. मनोहर तथा बापूसाहेब जोशी स्मृतीगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना प्रदान

एमपीसी न्यूज : ‘प्रसाद प्रकाशना’च्या (Prasad Prakashan) 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त पुरस्कार वितरण व ग्रंथप्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीचा कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी स्मृतीगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध प्रवचनकार, निरुपणकार व लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना तसेच कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखिका व संस्कृत तज्ज्ञ डॉ. अंजली पर्वते यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा 6 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे.

‘प्रसाद प्रकाशन’चे संपादक परंपरेतील कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कै. सौ. मंजिरी जोशी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘पुरस्कार वितरण आणि ग्रंथ प्रकाशन’ सोहळ्याचं आयोजन प्रसाद प्रकाशन हि संस्था करत असते. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक व नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून हि संस्था करते.

Rakshabandhan festival : ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये जवानांसोबत राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा

हा कार्यक्रम गणेश सभागृह, गोळवलकर गुरुजी शाळा, टिळक रोड येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित केला आहे. 1 ऑगस्ट 1947 पासून अखंड चालणाऱ्या प्रसादच्या वाड्मय प्रवासात प्रसाद प्रकाशनने मैलाचा 75 वा दगड गाठला आहे. पाऊण शतक अव्याहतपणे प्राचीन संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारे ग्रंथ, आध्यात्मिक, पारमार्थिक, धार्मिक विषयांवरील, श्रद्धेला पूरक असणारी पण अंध:श्रद्धेकडे न झुकणारी पुस्तके, प्रसादचा मासिक अंक, अशा सर्व प्रकारच्या वाड्मयाची निर्मिती करणे, याच ध्येयाने प्रेरित अशी प्रसाद प्रकाशन (Prasad Prakashan) ही संस्था काम करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.