Narendra Modi – Bhagwant Man : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून भगवंत मान यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज – पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. भगवंत मान यांनी बुधवारी (दि. 16) शहीद भगतसिंग यांच्या खटकल कला या गावी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “भगवंत मान (@BhagwantMann) जी यांचे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. पंजाबच्या विकासासाठी आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करू.”

भगवंत मान यांचा पंजाबमधील संगरुर मध्ये जन्म झाला. संगरुरमध्येच त्यांचे शिक्षण झाले. कॉमेडीयन म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर काही काळ त्यांनी कपिल शर्माच्या शो मध्ये देखील काम केले. काही सिरीयलमध्ये काम केल्यानंतर पंजाब पीपल्स पार्टीचे उमेदवार म्हणून भगवंत मान यांनी सन 2012 साली निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.

नंतर मान यांनी आप मध्ये प्रवेश केला. सन 2014 साली संगरुर मधून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. ते आपचे खासदार होते. नुत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात ते 58 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी मंगळवारी (दि. 15) आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. बुधवारी (दि. 16) ते पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.