Talegaon Dabhade News : तळेगाव शहर काँग्रेस कमिटीकडून योगी सरकारचा निषेध

एमपीसी न्यूज – एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने सहा शेतकऱ्यांना गाडीने चिरडून ठार मारले. या धक्कादायक घटनेबाबत पीडित कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी वॉड्रा जात असताना योगी सरकारने पोलीस बळाचा वापर करून प्रियांका गांधी यांना अटक करण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. याच्या निषेधार्थ तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात सोमवारी (दि. 4) सायंकाळी योगी सरकारचा निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नरेश आगरवाल, विलास नांगरे, अभिषेक गोडांबे, प्रभाकर ओमकार, अक्षय पोटे, संकेत खळदे, महेश खळदे, भूषण खळदे, पंढरीनाथ मखामले, अभिजित चौधरी,अमोल दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रास्ताविक राजेंद्र फलके यांनी केले अमर खळदे यांनी भाषणामध्ये हे राम राज्य नसून रावण राज्य आहे आणि यांच्या तोंडात राम, आचरणात नथुराम असे खडे बोल सुनावले. लिगल सेल तर्फे ॲड सुधीर भोंगाडे यांनी निषेध नोंदवला.

तळेगाव शहर काँग्रेस अध्यक्ष यांनी हाथरस प्रकरणाची आठवण करून योगी सरकार हे जुलमी सरकार आहे या सरकारने न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहे असे मनोगत व्यक्त केले तर आभार विशाल वाळुंज यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.