Pune : डिलीव्हरीसाठी दिलेले 47 हजारांचे अल्युमिनियम ब्रेक लिव्हर चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या (Pune) गोडाउनमध्ये पाठवण्यात आलेले 47 हजार 861 रुपयांचे अल्युमिनियम ब्रेक लिव्हर डिलीव्हरीसाठी घेऊन जाणाऱ्या गाडी चालकानेच चोरल्याची घटना वासुली फाटा येथे 19 ते 20 डिसेंबर या कालावधीत घडली आहे.

याप्रकऱणी प्रकाश निशीकांत गलबोटे (वय 42 रा. कात्रज) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वाहन चालक बालगीर आनंद गिरी (वय 27 रा. खेड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chakan : फळ विक्रेत्या महिलेची हातगाडीवरून पैशांची पर्स चोरीला

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, अडवीक हाय-टेक प्रा.लि. कंपनीमध्ये तयार झालेले 5 हजार 280 अल्युमीनीयम ब्रेक लिव्हरचे 10 सिलबंद बॉक्स घेऊन आरोपी त्याची टाटा एस गाडीने (एमएच 14 ईएम 0501)चिंबळी फाटा येथील गोडाऊनमध्ये घेऊन जात असताना त्याने त्याच्या साथादारांसोबत मिळून बॉक्समधून 47 हजार 861 रुपयांचे 1 हजार 930 अल्युमिनियम ब्रेक लिव्हर चोरून नेले. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.