Pune Police: पॅरॉलवर असणाऱ्या सराईताला दोन पिस्टल व काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज : खूनाच्या गुन्ह्यात पॅरॉलवर असणाऱ्या सराईताला पुणे पोलिसांनी दोन पिस्टल व काडतुसासह अटक केली आहे.(Pune Police) ही कारवाई पुणे आयुक्तालायाच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक दोन यांनी केली. रितीक राजू साठे (वय 21 रा. येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाला गस्त घालत असताना बातमीदाराला खबर मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार हा येरवाडा येथे एका टी स्टॉलजवळ शस्त्रासह उभा आहे.

Pune News: पुण्यात शुक्रवारी रंगणार भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा

पोलिसांनी त्यानुसार घटनास्थळीस जाऊन सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडील दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.(Pune Police) पोलिसांनी अधिक तपास केला असता तो काही दिवसांपूर्वीच येरवडा पोलीस ठाण्यातील एका खूनाच्या गुन्ह्यात कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.