Pune News : पुण्यात ‘पार्टी ऑल नाईट’ ! 31 डिसेंबरला रेस्ट्रोबार खुले राहणार पहाटे पाच वाजेपर्यंत

एमपीसी न्यूज : पुण्यात तरुणाईला नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करता येणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री पुण्यातील सर्व बार आणि रेस्ट्रोबार तब्बल पहाटे 5 पर्यन्त सुरू ठेवण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. यामुळे यंदाचे नवे वर्ष हे धूमधडाक्यात साजरे करता येणार आहे.(Pune News) राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र या सेलिब्रेशनवर पोलीसांचा वॅाच असणार आहे.

नवीन वर्ष जल्लोषात साजरे करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. राज्य शासनानेही जोरदार तयारी केली आहे. या दिवशी मद्यविक्रीतून मोठा महसूल शासनाला मिळणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर या वर्षी निर्बंध मुक्त नवीन वर्ष साजरे करता येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये यंदा उत्साहाचे वातावरण आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी राज्य शासनाच्या निर्णयाची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Alandi News : पंजाब मधील संत नामदेव दरबार कमिटीची माऊली मंदिरास सदिच्छा भेट

ते म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गैर प्रकार टाळण्यासाठी पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात राहणार आहेत. या दिवशी बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन होऊ नये, म्हणून विभागाचे लक्ष राहणार आहे. (Pune News) या साठी तब्बल 24 पथके तैनात करण्यात आली आहे. यात दोन अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश प्रत्येक पथकात राहणार आहे. या पथकांचे नियोजन दोन उपअधीक्षक करणार आहेत.

हॉटेल 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात त्यांनी शासनाचे नियम पाळावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी, आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.