Pune dance event: भारतीय विद्या भवनमध्ये 27 ऑगस्ट रोजी ‘सक्षम ‘ नृत्य कार्यक्रम

एमपीसी न्यूज: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ सक्षम ‘ या नृत्याच्या कार्यक्रमाचे (Pune dance event) आयोजन शनिवार, 27 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  करण्यात आले आहे.’ स्वरदा भावे प्रस्तुत या कार्यक्रमात पूर्वा सारस्वत (भरतनाट्यम् ), डॉ. परिमल फडके यांच्या शिष्या दुर्गा टिळक तसेच नृत्यगुरु राजश्री खरे यांच्या शिष्यवृंदाचे  नृत्य सादरीकरण होणार आहे.

Mulshi Dam: मुळशी धरणाच्या सांडव्यातून 2680 क्यूसेक विसर्ग

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  137 वा कार्यक्रम आहे.(Pune dance event) भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सक्षम ‘ कार्यक्रमामार्फत व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.