Pune : आज शरद पवार यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव ; तर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले स्मरण

एमपीसी न्यूज – आज भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ( Pune)  जयंतीनिमित्ताने कार्यकर्त्यांनी स्मरण केले. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार यांच्या अनुपस्थितीतच प्रथमच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. राज्यात शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. त्यामुळे आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Cricket : U19 वुमेन्स व्हेरॉक कप सामन्यात सुहानी कहांडळ व सहेज कौर ठरल्या सामना वीरांगना

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र, अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने 2 गट निर्माण झाले आहेत. तर, दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांचे असंख्य कार्यकर्त्यांनी स्मरण केले. पवार आणि मुंडे हे एकेकाळीचे कट्टर विरोधक आज मात्र दोघांचाही वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी आठवण केली.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. अलीकडच्या काळात मात्र अजित पवार यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातही 2 गट निर्माण झाले. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचेही पुणे जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते तयार केले होते. त्यामुळे अनेकांनी आज त्यांच्या आठवणींना उजाळा ( Pune) दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.