Pune : भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा डंपरच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज : भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या तरुणाचा (Pune ) अपघातात दुर्दैवी अंत झाला. ही घटना बुधवारी 15  नोव्हेंबर रोजी आंबेगाव पठार येथे घडली. या तरुणाच्या दुचकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली.  

पंकज मनोहर पायगुडे (वय 29, रा. धायरी फाटा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंकजच्या भावाने तन्मय मनोहर पायगुडे (वय 26, रा. धायरी फाटा) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपर चालक हिमांशू मोहनलाल चोप्रा (वय 36, वडगावशेरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : माजी उपसभापती स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करतात तेव्हा…

भाऊबीजेनिमित्त पंकज हा आपल्या बहिणीला भेटायला कात्रज येथे जात होता. नवले पुलाजवळील महालक्ष्मी ग्रेनाईड (Pune) दुकानासमोर भरधाव वेगाने डंपर आला आणि त्याने पाठीमागून पंकजच्या दुचकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात पंकजचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.