Pune : रायझिंग पुणे च्या संघाला ब्रदरहुड प्रीमियर लीगचे विजेतेपद

एमपीसी न्यूज – ब्रदरहुड फाऊंडेशन, पुणे तर्फे आयोजित (Pune)ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023-2024 क्रिकेट स्पर्धेत रायझिंग पुणे संघाने जेजे जवान संघाचा पराभव करून ब्रदरहुड प्रीमियर लीग चषक जिंकला .

पुण्याच्या ब्रदरहुड फाऊंडेशनला यंदा 25 वर्षे पूर्ण झाली (Pune)आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ब्रदरहुड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. अशी माहिती अध्यक्ष पवनकुमार जैन व सरचिटणीस नरेंद्र गोयल यांनी दिली.

संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश गोयल, अध्यक्ष पवन कुमार जैन, नरेंद्र गोयल, राकेश अग्रवाल, नरेंद्र मित्तल आणि महिला संघांना गीता गोयल, प्रथम महिला कविता जैन, कांतादेवी गोयल आणि रुची गोयल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सल्लागार विकास गुप्ता, पवन बन्सल, संजय (प्रिन्स) अग्रवाल उपस्थित होते.

अग्रवाल समाजातील सर्व वयोगटातील लोकांना संघटित करण्याच्या मुख्य उद्देशाने ही क्रिकेट स्पर्धा सुरू केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष पवनकुमार जैन व सरचिटणीस नरेंद्र गोयल यांनी दिली.

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
ब्रदरहुड प्रीमियर लीग चे आयोजन अतिशय शानदारपणे केले. 4 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत सलग खेळलेल्या या ‘डे-नाईट मॅच’चे नियोजन अतिशय सुरळीतपणे करण्यात आले.

या ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023-2024 क्रिकेट स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना नरेंद्र गोयल म्हणाले की, या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले होते, त्यापैकी जिंकला.

संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अरविंद अग्रवालला सामनावीर, मालिकावीर आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबाने गौरविण्यात आले, तर जितेंद्र अग्रवालला ऑल राउंडर प्लेअर आणि रनर अप ट्रॉफीचा मान मिळाला.

या ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023-2024 क्रिकेट स्पर्धेचा समारोप लिजेंड स्पोर्ट्स क्लब, मुंढवा येथे झाला. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते, त्यामुळे खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.