Pune corona Update : 1188 रुग्ण कोरोनामुक्त, 1101 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू

67 हजार 777 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सोमवारीही तब्बल 1188 रुग्ण कोरोनाच्या आजारातून मुक्त झाले. 5 हजार 129 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1101 नवे रुग्ण आढळले. 45 जणांचा मृत्यू झाला. 802 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 487 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 84 हजार 496 रुग्ण झाले आहेत. 67 हजार 777 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 33 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 686 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बिबवेवाडीतील 31 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 72 वर्षीय पुरुषाचा, ताडीवला रोडवरील 42 वर्षीय पुरुषाचा, मुंढव्यातील 65 वर्षीय पुरुषाचा, सेनापती बापट रोडवरील 93 वर्षीय पुरुषाचा, मगरपट्टातील 50 वर्षीय महिलेचा, गुरुवार पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 67 वर्षीय पुरुषाचा, पाषाणमधील 72 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोंढाव्यातील 68 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 53 वर्षीय महिलेचा, नगररोडवरील 72 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 75 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 101 वर्षीय पुरुषाचा, वडगांवमधील 58 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 69 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 62 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

सिंहगड रोडवरील 72 वर्षीय पुरुषाचा सीमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, वडगाव बुद्रुकमधील 77 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 62 वर्षीय पुरुषाचा, वाकडेवाडीतील 69 वर्षीय महिलेचा, कसबा पेठेतील 83 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 62 वर्षीय महिलेचा, मार्केटयार्डमधील 64 वर्षीय पुरुषाचा, नारायण पेठेतील 54 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

कात्रजमधील 52 वर्षीय पुरुषाचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 65 वर्षीय महिलेचा, पाषाण रोडवरील 57 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 63 वर्षीय पुरुषाचा, जनतावसाहतमधील 54 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, मुंढव्यातील 65 वर्षीय महिलेचा, बोपोडीतील 60 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 60 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

आंबेगाव बुद्रुकमधील 47 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, सॉलिसबरी पार्कमधील 72 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 74 वर्षीय पुरुषाचा, वडगांवशेरीतील 56 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 52 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 51 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, वडगांवशेरीतील 46 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा, रविवार पेठेतील 75 वर्षीय महिलेचा युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये, गंजपेठेतील 75 वर्षीय महिलेचा, नाना पेठेतील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.