Pune Corona Update : 1384 नागरिक कोरोनामुक्त, 876 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू

कोरोनाचे पुणे शहरात 95 हजार 373 रुग्ण झाले आहेत. 78 हजार 70 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी तब्बल 1384 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 2 हजार 847 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 876 नवे रुग्ण आढळले. 37 जणांचा मृत्यू झाला.

सध्या 884 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 527 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 95 हजार 373 रुग्ण झाले आहेत. 78 हजार 70 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे  2 हजार 304 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 999 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोंढव्यातील 73 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 42 वर्षीय महिलेचा, उत्तमनगरमधील 58 वर्षीय पुरुषाचा, धानोरीतील 50 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 81 वर्षीय पुरुषाचा, शिवणेतील 56 वर्षीय महिलेचा, शनिवार पेठेतील 59 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 47 वर्षीय महिलेचा, वडगांवशेरीतील 51 वर्षीय महिलेचा, एरंडवणेतील 79 वर्षीय पुरुषाचा, गणेश पेठेतील 52 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

गणेशखिंडमधील 80 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 50 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 86 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 50 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 50 वर्षीय पुरुषाचा, शिवणेतील 62 वर्षीय पुरुषाचा, वडगांव बुद्रुकमधील 58 वर्षीय पुरुषाचा, औंधमधील 73 वर्षीय महिलेचा, कर्वेनगरमधील 62 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मॉडेल कॉलनीतील 82 वर्षीय पुरुषाचा, जळगावमधील 81 वर्षीय महिलेचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, वडगांव बुद्रुकमधील 58 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 64 वर्षीय पुरुषाचा श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये, बालाजीनगरमधील 49 वर्षीय महिलेचा, कोंढवा बुद्रुकमधील 67 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोथरूडमधील 66 वर्षीय पुरुषाचा परमार हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 40 वर्षीय महिलेचा मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 83 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 86 वर्षीय पुरुषाचा अनुप हॉस्पिटलमध्ये, जाधव वस्तीमधील 75 वर्षीय महिलेचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 68 वर्षीय पुरुषाचा AIMS हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, कोंढवा बुद्रुकमधील 58 वर्षीय पुरुषाचा लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये, हांडेवाडीतील 71 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 37 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.