Pune Corona Update : 1639 नागरिक कोरोनामुक्त, 2053 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू

आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 549 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. सोमवारी तब्बल 1639 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 3 हजार 354 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2 हजार 53 नवे रुग्ण आढळले. 37 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 912 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 480 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 7 हजार 958 रुग्ण झाले आहेत. 88 हजार 579 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 549 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 830 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

दांडेकर पुलावरील 58 वर्षीय महिलेचा, मार्केटयार्डमधील 85 वर्षीय महिलेचा, कर्वेनगरमधील 49 वर्षीय महिलेचा, वडगावशेरीतील 73 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 77 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 73 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धनकवडीतील 78 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 59 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, चंदननगरमधील 38 वर्षीय पुरुषाचा सीमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 72 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, घोरपडीतील 75 वर्षीय पुरुषाचा, धायरीतील 64 वर्षीय पुरुषाचा, लोहगावमधील 80 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

औंधमधील 85 वर्षीय पुरुषाचा AIMS हॉस्पिटलमध्ये, बाणेरमधील 64 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 61 वर्षीय महिलेचा, कराडमधील 79 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 37 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 64 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 65 वर्षीय महिलेचा, नेताजी वाडीतील 59 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

दत्तनगरमधील 75 वर्षीय महिलेचा औरा हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 81 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 49 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 60 वर्षीय महिलेचा, गणेश पार्कमधील 61 वर्षीय महिलेचा, कोंढव्यातील 62 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, बालाजीनगरमधील 68 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मंगळवार पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा सीमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, उंडरीतील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 58 वर्षीय महिलेचा, 80 आणि 35 वर्षीय पुरुषाचा, बालेवाडीतील 41 वर्षीय पुरुषाचा D. H. औंधमध्ये, पंचवटीतील 49 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 81 वर्षीय पुरुषाचा तोडकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.