रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune Corona Update : दिवसभरात 739 पॉझिटिव्ह रुग्ण; 412 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज शनिवारी (दि.27) दिवसभरात 739 नवे रुग्ण सापडले. तर 412 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा एकदा एका दिवसात 700 चा टप्पा पार झाला आहे.

आज कोरोनाबाधीत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 260 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून 509 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 1 हजार 928 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4574 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4853 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार कोरोना बाधितांची संख्या संथगतीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news