Pune Crime : जमिनीवर कारवाई होऊ नये म्हणून डेप्युटी इंजिनिअरला साडेतीन लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

एमपीसी न्यूज : जमिनीवर कारवाई होऊ नये यासाठी (Pune Crime) सात लाख रुपये मागून त्यातील साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना जलसंपदा विभागातील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे डेप्युटी इंजिनिअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.   

भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे डेप्युटी इंजिनिअर तुळशीदास आंधळे (वय 57 वर्ष) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 23 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत शिवाजीनगर येथील मोदी बाग आवारात करण्यात आली. आरोपीला सापळा रचून 24 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी-विक्री तसेच जमीन प्लॉट डेव्हलपमेंट करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे खेड तालुक्यातील कोळए येथे जमिनीचे सपाटीकरण व डेव्हलपमेंटचे काम सुरू असताना तुळशीदास आंधळे यांनी त्या जागेवर भेट दिली. पाहणी करून या जमीनीवर पूर रेषेच्या आत सपाटीकरण/डेव्हलपमेंटचे काम केले असून यावर रीतसर कारवाई करणार असल्याचे सांगितले. ही कारवाई होऊ नये यासाठी आंधळे यांनी सात लाख रुपयांची मागणी केली.

Chinchwad Bye-Election : कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करावे – श्रीकांत देशपांडे

या सात लाख रुपयांपैकी 3 लाख 50 हजार रुपये घेताना आंधळे यांना 24 फेब्रुवारी (Pune Crime) रोजी घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.