Pune : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे 100 तृतीयपंथीयांना धान्य वाटप

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या तृतीयपंथीयांना दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे धान्य देण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे विविध घटकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी परिसरात राहणा-या १०० हून अधिक तृतीयपंथीयांना 1 महिना पुरेल इतकी धान्याची मदत देण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण, निर्भया संस्थेच्या तृतीयपंथी चांदनी गोरे यांसह काही कार्यकर्ते उपस्थित होते. बिबवेवाडी परिसरातील तृतीयपंथीयांना घरोघरी जाऊन ही गहू, तांदूळ, तेल, डाळी यांसह ्नधान्य मदत म्हणून देण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

माणिक चव्हाण म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील वंचित व गरजू घटकांना मदतीचा हात देण्याकरीता आम्ही ट्रस्टतर्फे प्रयत्न करीत आहोत.

तृतीयपंथीयांना धान्यरुपी मदत देण्यासोबतच समाजातील इतर घटकांना देखील मदत देण्याचे काम सुरु आहे. कोणालाही मदतीची गरज असल्यास ट्रस्ट सदैव तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.