Pune: नाभिकांना आर्थिक मदत जाहीर करा, सलून असोसिएशनची मागणी

Pune: Declare financial aid to barber, demand of Salon Association

एमपीसी न्यूज- टाळेबंदीमुळे अडीच महिन्यांपासून केशकर्तनाची दुकाने बंद असल्याने व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर संकट ओढवले आहे. या काळात दुकानभाडे, वीजबिल, थकले असून कुटूंब चालविण्यासाठीसुध्दा पैसे उरलेले नाही त्यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी सलून असोसिएशन केली आहे.

जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद असलेल्या सलून व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यापासून दुकानाचे भाडे थकल्याने घरमालकाकडून घर खाली करण्याचे ताकीद मिळाली आहे.

ताळेबंदीत अनेकांना दुकाने बंद करून घरी बसण्याची वेळ आली. अक्षरश: उपासमार सहन करणाऱ्या या व्यावसायिकांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.

पाचव्या टप्यातील टाळेबंदीत सलून वगळता इतर सर्व दुकानांना सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र नाभिक समाजाने याकडे लक्ष वेधण्यासाठी दुकानापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे सलून असोसिएशनचे अध्यक्ष लिलाधर येउलकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

येउलकर पुढे म्हणाले कि, शासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नये. या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, वीजबिल माफ करावे, दुकानदारांना दहा हजार रुपये तर कारागिरांना सात हजार रुपये प्रती महिना अनुदान द्यावे.

दुकान सुरू करण्यास परवानगी देताना संरक्षणासाठी प्रशिक्षण द्यावे. तसेच मोफत पीपीई कीट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागण्याकडे त्वरित लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.