Pune: धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, ‘खडकवासला’तून आज पाणी सोडणार

Pune: Heavy rains in dam area, release of water from Khadakwasla dam today खडकवासला धरणाची क्षमता 1.75 टीएमसी आहे. त्यामुळे हे धरण लवकर भरते. वरील पानशेत, टेमघर आणि वरसगाव हे धरण मोठे असून ते भरण्याची गरज आहे.

एमपीसी न्यूज – मागील तीन दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जवळपास 3 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरण परिसरातील पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी (दि.6) दुपारपर्यंत खडकवासला धरण भरणार आहे. आधी कॅनॉलद्वारे विसर्ग सुरू केला जाणार आहे. आवक वाढतच राहिली तर नदीपात्रातूनही विसर्ग केला जाऊ शकतो. महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बारकाईने लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, खडकवासला धरणाची क्षमता 1.75 टीएमसी आहे. त्यामुळे हे धरण लवकर भरते. वरील पानशेत, टेमघर आणि वरसगाव हे धरण मोठे असून ते भरण्याची गरज आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. ऑगस्ट अखेरीपर्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट सध्या तरी टळले आहे. या धरणांतून पुणे महापालिका महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी उचलते. वर्षाला पुणेकरांना सुमारे 18 टीएमसी पाणी लागते.

यावर्षी कधी नव्हे ते जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली. मात्र, आता ही कसर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत भरून निघणार असल्याचे सांगण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.