Pune: मंगळवारपासून मार्केट यार्ड सुरु, पण ‘या’ वेळेतच होणार व्यवहार

Pune: Market yard will start from Tuesday, but transactions will take place at this time हे सर्व बाजार चालविताना सामाजिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

एमपीसी न्यूज – गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला, गुळ-भुसार बाजार दि. 21 जुलैपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार आहे. महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी व प्रशासक यांच्यामध्ये बाजार समिती बाजार सुरू करण्याबात चर्चा झाली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख बाजार आवार भाजीपाला, फळे, भुसार बाजार आवार आणि उपबाजार आवार हे सर्व जिल्हा प्रशासनाने घोषित केल्याप्रमाणे 14 जुलैपासून तर आजपर्यंत बंद होते.

जिल्हा प्रशासनाने आता घेतलेल्या निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवार हा दि. 21 जुलै पासून दैनंदिन सुरू होईल. परंतु, तो सुरू करताना आणि त्यामध्ये काही बदल होईल. तो सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेतच चालू राहील. शेतकरी रात्री शेतीमाल घेऊन येतील. सकाळी 8 ते 12 या वेळेत मालाचा खरेदी- विक्रीचा व्यवहार होईल.

त्याचप्रमाणे मुख्य बाजारातील भूसार बाजार आहे. तो सकाळी 8 ते 12 या वेळेतच सुरू राहील. फुलांचा बाजार 24 जुलैपर्यंत बंद राहील. त्याचप्रमाणे मोशी, मांजरी, उत्तमनगर आणि खडकी हे उपबाजार सुध्दा आम्ही सुरू करीत आहोत.

मांजरीचा उपबाजार आवार दि. 21 जुलैपासून सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू होणार आहे. मोशीचा बाजार आवार दि. 20 जुलैपासून सुरू होत आहे. तो रात्री 1 ला मालाची आवक सुरू होईल. आणि सकाळी 9 वाजेपर्यंत शेतीमालाची खरेदी-विक्री होईल.

उत्तमनगर आणि खडकी बाजार आवार सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत दैनंदिन सुरू राहतील. आशा प्रकारची सर्व बाजार सुरू करण्याची उपाययोजना संबंधित आडते असोसिएशनचे पदाधिकारी आणि अन्य बाजार घटकांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला आहे.

हे सर्व बाजार चालविताना सामाजिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.