Pune : पुणे महापालिकेने शिवभोजन योजना सुरू करावी – आम आदमी पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य नागरिकांनाही अल्प दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.  

नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांना अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्याऐवजी महापालिकेने महाराष्ट्र शासनाची ‘शिवभोजन’ योजना राबवावी व महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे ४० रूपयांचे अनुदान मिळवावे, असेही सांगितले.
आम आमदी पार्टीच्या वतीने गुरुवारी महापालिकेसमोर सवलतीच्या दरातील खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे संघटन मंत्री अभिजित मोरे, बाबू ओरसे, सुजय सेठ, आप युवा आघाडी उपाध्यक्ष संदीप सोनवणे, सतीश यादव, शहर सहसचिव मोहनसिंग रजपूत, वाहतूक आघाडीचे सुभाष करांडे आदी उपस्थित होते़ आंदोलनादरम्यान पक्षाच्या वतीने मनपा उपयुक्त राजेंद्र मुठे यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे आपल्या मागण्या सादर करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.