Pune : नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मध्ये पेट्रोल – डिझेलच्या भाववाढीवर बोलावे : मोहन जोशी

Narendra Modi should speak on petrol-diesel price hike in 'Mann Ki Baat': Mohan Joshi

एमपीसी न्यूज – मागील 20 दिवसांपासून रोज सातत्याने पेट्रोल – डिझेलचे भाव वाढत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये बोलावे, अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते गुरुवारी बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. तरीही आपल्या देशात मात्र पेट्रोल – डिझेलच्या किमती वाढत आहेत. आधीच कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामध्ये ही जीवघेणी महागाई नकोशी झाली आहे.

पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या भाववाढीबद्दल नरेंद्र मोदी यांनी या वेळच्या ‘मन की बात’ मध्ये बोलावे, अशी अपेक्षाही जोशी यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटामुळे जनता त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी किमतींचा फायदा थेट जनतेला देण्याचे टाळून नरेंद्र मोदी सरकार नफेखोरी करत असल्याचा आरोप जोशी यांनी केला.

कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर 40 डॉलर पेक्षा कमी असताना पेट्रोलचा दर 86 रुपयांवर का गेला, याचा खुलासा मोदी यांनी करावा, असेही मोहन जोशी म्हणाले.

सध्या प्रथमच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.