Pune news: नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज: पुण्याच्या धानोरी परिसरातील एका व्यक्तीची नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल 2017 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

तक्रारदार यांना नोकरीची आवशकता होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली होती. यादरम्यान, आरोपीने त्यांना सिजेंन्टा या कंपनीत नोकरी लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडून 7 लाख रुपये उकळले. परंतु, नोकरी लावली नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता त्यांना 3 लाख 33 हजार रुपये दिले. परंतु, उर्वरित रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.