Pune News : छलांग फौंडेशन व शिवजयंती समिती तर्फे आयोजित शिबिरात 97 जणांचे रक्तदान 

एमपीसी न्यूज – ले_छलांग फौंडेशन व अखिल छत्रपती शिवाजीनगर शिवजयंती समितीतर्फे आयोजित शिबिरात 97 जणांचे रक्तदान केले. 

शिवाजी नगर, पुणे येथे आज (दि.06) हे रक्तदान शिबिर पार पडले. 
रक्तदान करणा-या प्रत्येकास सामाजिक भान म्हणून एक वृक्ष भेट देण्यात आले. रक्तदात्यांना रक्तदानासोबत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ले छलांग फौंडेशन तरुणांना नोकरी व व्यक्तिगत विकासासाठी सहकार्य करणारी समाजसेवी संस्था आहे. मनोज कदम व मनीष ठोकरे यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
सचिन कट्टे, जितेंद्र पाटील, ओमकार गावडे , प्रतीक शेजुळ, आकाश पाटील, मनोहर वानखेडे, निखिल राऊत, सुंदर बेले, पंकज देशमुख, बाळासाहेब बोडके, मंदार बहिरट, निलेश इंगवले, प्रशांत धुमाळ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.